प्रतिनिधी राजाराम गायकवाड
शिक्रापूर (ता. शिरूर) अध्यात्मिक क्षेत्रात दीर्घकाळ दिलेले योगदान आणि पक्ष संघटनेतील मजबूत कामगिरीची दखल घेत पंढरीनाथ बबनराव गायकवाड यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उत्तर विभागाच्या अध्यात्मिक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून, त्यांच्या निवडीचे पत्र भाजपचे नेते प्रदीप कंद यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.
यापूर्वी त्यांनी भाजप तालुका सरचिटणीस म्हणून प्रभावीपणे काम करत पक्ष संघटना बळकट करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या याच कार्याची आणि अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.गायकवाड यांच्या या निवडीमुळे शिक्रापूर परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी पंढरीनाथ गायकवाड यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याची ग्वाही दिली आहे. “आपण अध्यात्म आणि समाजसेवा यांचा संगम घडवत पक्षाच्या तत्त्वज्ञानाचा आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध राहू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंढरीनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा उत्तर विभागाची अध्यात्मिक आघाडी नव्या जोमाने आणि कार्यक्षमतेने काम करेल, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. या निवडीमुळे अध्यात्मिक आघाडीच्या कार्यात मोठी गती येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
