उरळगाव–न्हावरा परिसराच्या वीजप्रश्नांना अखेर दिलासा; २ कोटींच्या प्रकल्पाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते लोकार्पण
संपादक उदयकांत ब्राम्हणे शिरूर-हवेली मतदारसंघातील उरळगाव, न्हावरा, आलेगावपागा आणि परिसरातील अनेक वर्षांपासून शेतकरी व नागरिकांना भेडसावणाऱ्या अपुरा वीजपुरवठा, कमी दाबाचा वीजप्रवाह (लो व्होल्टेज) आणि सिंगल फेजिंगच्या समस्येवर अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सुमारे दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ५ एम.व्ही.ए. क्षमतेच्या अतिरिक्त पॉवर रोहित्रासह ११ केव्हीच्या सहा…
