thenirbhidswarajyatimes

आंबेगावमध्ये तलाठी पतीचे अनैतिक संबंध, पॅरालिसिस झालेल्या पत्नीसह मेहुण्याला अमानुष मारहाण

thenirbhidswarajyatimes

पुणे: पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे एका तलाठी पतीने पॅरालिसिस झालेल्या पत्नीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पत्नीच्या गळ्याला गंभीर ओरखडे पाडण्यासोबतच मेहुण्यालाही मारहाण केली आहे. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून तलाठी पतीवर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या स्वाती शंकर दिवेकर यांनी पती शंकर आप्पासाहेब दिवेकर (मूळ रा. पाटस, ता. दौंड) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी तलाठी पतीचे मनीषा सकुंडे नावाच्या दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते.

पीडित स्वाती यांच्या म्हणण्यानुसार, जून महिन्यात पतीने त्यांना “मला तिच्याशी लग्न करायचे आहे, तू मला घटस्फोट दे,” असे सांगून शिवीगाळ केली आणि मारहाण केली. हा प्रकार वारंवार घडत होता.

दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास आरोपी पतीने आपल्या आईला फोन करून पत्नी स्वाती यांच्याबद्दल काहीतरी चर्चा केली. स्वाती यांनी याबाबत विचारणा करताच, पतीला राग आला. त्याने स्वाती यांना लाथाबुक्क्यांनी आणि खुर्चीने अमानुष मारहाण केली, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!